Saturday, March 5, 2011

प्राईझ आणि सरप्राईझ - भाग २

"ते तू माझ्यावर सोड" कोमल खुर्चीत मागे रेलत म्हणाली, "तू फक्त तयार आहेस की नाही ते सांग. माझ्याकडं सगळा प्लॅन रेडी आहे. मी मुलगी आहे म्हणून, नाहीतर मीच..."
"पण मी तयार होईनच असं कशावरुन वाटलं तुला? जर मी नाही म्हटलं तर?"
आदित्यच्या या प्रश्नावर कोमल थोडी विचारात पडल्यासारखी वाटली; पण दुसर्‍याच क्षणी पुढं झुकत तिनं आपले दोन्ही हात त्याच्या डोक्यामागं नेले. त्याचा चेहरा पुढं ओढत तिनं आपले ओठ जोरात त्याच्या ओठांवर दाबले. त्याचा चेहरा घट्ट धरुन ठेवत ती स्वतःची मान दोन्ही बाजूला झुकवत त्याचे ओठ शोषत होती. मध्येच तिच्या जिभेच्या स्पर्शानं त्याच्या अंगावर रोमांच उभे होत होते. काही क्षण या अवस्थेत गेल्यावर त्याचा चेहरा मागं ढकलत ती खुर्चीत रेलली. आदित्यला सावरण्याची संधी न देताच तिथून उठत ती म्हणाली, "नाही तर तू म्हणूच शकत नाहीस. नाहीतर तुला एवढं सांगितलं कशाला असतं? तरीपण तुझ्याकडं आजचा दिवस आहे. विचार कर आणि उद्या होय म्हण." चेहर्‍यावर विजयी हास्य घेऊन ती निघूनही गेली. आदित्य मात्र, गळाला लावलेला मासा की गळाला अडकलेला मासा, यावर विचार करत बसला.

तारवटलेल्या डोळ्यांनी दुसर्‍या दिवशी आदित्य ऑफीसला आला तर सगळे त्याच्याकडं "रात्रीची उतरली नाही की सकाळी-सकाळीच?" अशा नजरेनं बघू लागले. त्यांचा तरी काय दोष? रात्रभर विचार करत बसल्यानं त्याची अवस्था खरोखरच तशी झाली होती. डोक्याला खूप ताण देऊनही, कोमलचा त्याला निवडण्यामागचा हेतू काही कळत नव्हता. यावर कुणाशी बोलता येणंही शक्य नव्हतं. शिल्पाला तर यातून पूर्ण बाहेर ठेवणं भाग होतं. त्यांच्या इतक्या वर्षांच्या 'मैत्री'नंतरही आदित्य तिला शारीरिक जवळीकीसाठी पटवू शकला नव्हता, तर अशा गोष्टीसाठी तिनं त्याचा जीवच घेतला असता. शेवटी त्यातल्या जबरदस्त फायद्यांचा विचार करुन त्यानं धोक्यांकडं पूर्ण दुर्लक्ष करायचं ठरवलं.

"कोमल, मी तयार आहे. पण मला अजूनही कळत नाही हे होणार कसं?" कोमल दिसताच आदित्य आजूबाजूचा अंदाज घेऊन म्हणाला.
"दॅट्स लाईक अ गुड बॉय" समाधानानं हसत कोमल म्हणाली, "आता नो मोअर चर्चा इन ऑफीस. संध्याकाळी तू मला घरी ड्रॉप करायला यायचंस, त्यावेळी पुढचं बोलू. नाऊ बॅक टू वर्क."
आदित्यनं आपसूक मान हलवली आणि तिच्या मागं ट्रेनिंग रुममध्ये घुसला. त्यानंतर दिवसभर कोमलनं एकदाही तो विषय काढला नाही. त्याच्या डोक्यात मात्र दुसरा विचारच येत नव्हता. आता पुढं काय, यावरच विचारांची गाडी अडत होती.

संध्याकाळी आदित्य लवकर बाहेर पडला आणि पार्कींगमध्ये कोमल ची वाट पहात थांबला. आज ट्रेनिंग संपून काम सुरु होत असल्यानं संध्याकाळी ऑफीसमधून उशिरा बाहेर पडेन, असं त्यानं शिल्पाला सांगितलं होतं. कोमलसोबत असताना शिल्पाचा फोन आला असता तर त्याला नीट बोलताही आलं नसतं आणि तिला उगाच (?) संशय आला असता, म्हणून ही सोय. कोमल आल्यावर त्यानं लगेच गाडी काढली.

"तू गाडी नाही आणलीस आज?" काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं विचारलं.
"तू सोडायला येणार होतास ना, म्हणून सकाळी रिक्षानं आले" तिच्या चेहर्‍यावरचं हास्य तसंच होतं. हिला भविष्य कळतं की काय, अशी शंका त्याच्या मनात येऊन गेली. नाहीतर तो होयच म्हणनार आहे हे एवढ्या ठामपणे कसं काय कळलं असेल तिला?
"कुठं घेऊ गाडी?" कसंनुसं हसत त्यानं विचारलं.
"माझ्या घरीच जाऊयात. तिथंच आपल्याला निवांत बोलता येईल." गालात जीभ घोळवत कोमल म्हणाली. मागच्या दोन दिवसात ऑफीसमध्येच जिनं एवढा जबरदस्त किसिंगचा अनुभव दिला होता, तिच्या 'निवांत'पणावर आदित्य काहीही ओवाळून टाकायला तयार होता.
तिनं सांगितलेल्या रस्त्यांवरुन तो सुसाट निघाला. त्याची बेचैनी दिसून येण्याइतपत जास्त होती. कोमल मात्र मोकळेपणानं गप्पा मारत होती. अर्ध्या तासाच्या ड्राईव्हनंतर दोघं तिच्या घरी पोहोचले. आदित्यच्या अंदाजानुसार तिच्या घरी तिचा नवरा आणि मुलगा असायला हवे होते. प्रत्यक्षात मात्र घराला कुलुप होतं.
"तू घरी एकटीच..." कुलुप उघडून आत जाताना त्यानं विचारलं.
"हो ना, अरे माझा नवरा गेलाय ऑफीसच्या टूरवर, आणि मुलाला माझी कझिन घेऊन गेलीय दोन दिवसांसाठी." पुढचा दरवाजा बंद करीत कोमल म्हणाली, "तशीही आज एकटीच होते, म्हटलं आपलं काम तरी सुरु होईल..."
"हं.. बरोबर" तो थोडासा अवघडत म्हणाला. हिच्या डोक्यात काय चाललंय याचा त्याला अजून पत्ता लागत नव्हता. ती एकेका खोलीतले लाईट लावत निघाली होती आणि तो तिच्या मागोमाग चालला होता.
"तू आधी फ्रेश होऊन घे, तोपर्यंत मी खाण्या-पिण्याची सोय करते." असं म्हणून तिनं त्याला बाथरुमपर्यंत आणून सोडलं.
आदित्य फ्रेश होऊन येईपर्यंत कोमलनं डायनिंग टेबलवर बरंच साहित्य मांडून ठेवलं होतं. त्यांची अजून फार ओळख नसल्यानं बोलण्यात ऑफीसचेच विषय होते. थोडंसं खाऊन घेतल्यावर तिनं फ्रिजमधून बीयरचे दोन टिन काढले आणि बेडरुमकडे निघाली. आदित्य गुपचूप तिच्या मागोमाग निघाला.

तिच्या प्रशस्त बेडरुमला तेवढीच प्रशस्त बाल्कनी होती. बाल्कनीतला मंद लाईट चालू करुन दोघं बियरचे टिन घेऊन बसले. रात्रीची नुकतीच सुरुवात होत होती. आदित्यच्या अंगावर येणारा शहारा थंडगार हवेमुळं होता की कोमलच्या सान्निध्यामुळं ते त्याला अजूनही सांगता नसतं आलं. दोन तीन सिप घेतल्यावर कोमल उठली व 'आलेच' म्हणून बेडरुममध्ये गेली. आदित्य शांतपणे आपला टिन घेऊन बाहेर बघत बसला होता. डोक्यात शिल्पाचे विचार येत होते. असा निवांत एकांत आपल्याला कधी मिळाला होता का ते आठवत होता. तसा एकांत मिळायची शक्यता होती, पण शिल्पाची त्यासाठी कधीच तयारी नसायची. त्यांच्या भेटण्याच्या जागा म्हणजे हॉटेल, पार्क, मंदीर, किंवा अशीच एखादी पब्लिक प्लेस. कदाचित अशा एकांतात त्याचा स्वतःवर ताबा राहणार नाही याची तिला खात्री असावी. त्याचा की तिचा... की दोघांचाही? या विचारानं आदित्यला हसू आलं.
"असा एकटाच काय हसतोयस? मला पण सांग की." कोमल बाल्कनीमध्ये येत म्हणाली. काही क्षणांपुरतं आपण कुठं आलोय, कुणासोबत आलोय, का आलोय, हे तो विसरुनच गेला होता.
"काही नाही, असंच" तो शिल्पाचा विषय टाळत म्हणाला. कोमल आत जाऊन ड्रेस चेंज करुन आली होती. ऑफीसचा ड्रेस बदलून तिनं छान सुटसुटीत निळसर नाईट ड्रेस घातला होता. एरवी रस्त्यावरच्या येणार्‍या-जाणार्‍या मुलींचा नजरेनं एक्सरे करणार्‍या आदित्यला फार वेळ कोमलकडं बघायचं धाडस होत नव्हतं. एखाद्या मुलीसोबत एवढा एकांत पहिल्यांदाच अनुभवत होता, त्यामुळं असेल कदाचित.
त्याची अडचण लक्षात येऊन तिनं आपली खुर्ची त्याच्या खुर्चीजवळ सरकवली. त्याला स्वतःकडे ओढत आपला हात त्याच्या हातातून गुंफून घेत तिनं त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं. आदित्यच्या छातीतली धडधड वाढू लागली. घशाला कोरड पडू लागली. ती जे काही करत होती ते त्याला नको होतं असं अजिबात नव्हतं; पण मन आणि शरीर यांपैकी कुणीच या सगळ्यासाठी तयार नव्हतं. त्याच्या खांद्यावर डोळे मिटून टेकली असतानाच तिनं एक हात त्याच्या शर्टच्या वरच्या बटनाकडं नेला. थोडासा चाळा करत तिनं वरची दोन-तीन बटणं उघडली. हळू-हळू आत हात नेत ती त्याला आपल्याकडं ओढत होती. अलगद तिचे ओठ त्याच्या मानेवर टेकले. त्यानंही एका हातानं तिला कुशीत घेत आपली मान झुकवली. दुसर्‍या हातानं तिची हनुवटी वर उचलून त्यानं तिचे नाजूक ओठ आपल्या ओठांपर्यंत आणले. दुसर्‍याच क्षणाला दोघांचे ओठ एकजीव झाले. त्याच्या ओठांचे चावे घेत, शोषत ती आणखी जवळ-जवळ येत होती. किती वेळ तशा अवस्थेत गेला त्याला कळलंच नाही; पण भानावर आला तेव्हा कोमल पूर्णपणे त्याच्या मांडीवर बसली होती, त्याच्या शर्टची सगळी बटनं निघाली होती, तिचे दोन्ही हात त्याच्या काखांतून ओवून पाठीवर घट्ट बांधले होते, आणि त्याचा एक हात तिच्या केसांत तर दुसरा तिच्या टी-शर्टच्या आत पोचला होता. आपल्या स्पीडचं त्याला स्वतःलाच हसू आलं. तिच्या टी-शर्टमध्ये चाचपडणारा त्याचा हात तिनं योग्य जागी पोचवला आणि बाहेरुनच तो हात आवळत पुन्हा त्याच्या ओठांवर झुकत म्हणाली, "सगळा प्रोग्रॅम खुर्चीवरच करायचा की बेडवर पण जायचं?"

(क्रमशः)

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...